झाशीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवत काँग्रेसच्या मॅरेथॉनमध्ये हजारो मुली सहभागी!!


प्रतिनिधी

झाशी : देशभरात कोरोना आणि ओमायक्रोनचा धोका वाढत असताना कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. या निर्णयाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. कोरोनाशी लढताना सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे.Congress girls marathon in jashi without mask and social distancing

मास्क वापरला पाहिजे, असे जे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले, त्या आवाहनाला मात्र काँग्रेसच्या मॅरेथॉनमध्ये आज हजारो मुलींनी पायदळी तुडवले.काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या आवाहनानुसार झाशीमध्ये काँग्रेसने मुलींची मॅरेथॉन घेतली. लडकी हूं, लढ सकती हूं।,



अशा घोषणा देत सुमारे दहा हजार मुली झाशीमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंगचा देखील पत्ता नव्हता. त्यामुळे सगळीकडून प्रियांका गांधी यांच्या मॅरेथॉन मोहिमेवर सोशल मीडियातून टीकास्त्र सोडले जात आहे.

स्वतः प्रियांका गांधी यांनी मात्र योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मध्ये मॅरेथॉनची परवानगी नाकारली पण त्याला झाशीच्या मुलींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हजारो मुली आज रस्त्यावर धावले आहेत.

त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. लडकी हूं लढ सकती हूं।, हे झाशीच्या हजारो मुलींनी योगी आदित्यनाथ यांना दाखवून दिले आहे, असा दावाही प्रियंका गांधी यांनी केला आहे. प्रत्यक्षात या मुलींच्या मॅरेथॉनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावली पूर्णपणे पायदळी तुडवली गेली आहे.

Congress girls marathon in jashi without mask and social distancing

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात