बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी


मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.Bihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured


विशेष प्रतिनिधी

बिहार : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.बेला इथं कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला.यामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.बॉयलर फुटल्यानंतर जवळपास ५ किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू आला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामुळे आजुबाजुला असणाऱ्या कारखान्यांचेही काही नुकसान झाले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उपस्थित आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Bihar: Boiler explodes in crunchy and noodles factory, 6 killed; 12 injured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था