पनवेल येथील फार्म हाऊसवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेलेल्या अभिनेता सलमान खान याला मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्पदंश झाला. साप बिनिषारी असल्याने सलमान बचावला. Salman Khan was bitten by a snake at a farm house in Panvel and was rescued as it was a non-venomous snake
विशेष प्रतिनिधी
मुंबई :पनवेल येथील फार्म हाऊसवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेलेल्या अभिनेता सलमान खान याला मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्पदंश झाला. साप बिनिषारी असल्याने सलमान बचावला. पनवेल तालुक्यातील वाजेपुर येथे सलमान खानचे अर्पिता फार्म नावाचे फार्म हाऊस आहे.याठिकाणी मध्यरात्री सलमानला साप चावला. शनिवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास सलमान खानला एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले होते.यावेळी सलमानवर प्राथमिक उपचार करण्यात आले..सकाळी 9 च्या सुमारास सलमान खानला रुग्णालयातून सोडण्यात आले. सलमान एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथक यांच्यासोबत त्याच्या पनवेल मधील वाजेपुर येथील अर्पिता फार्म याठिकाणी थांबला आहे. सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस अथवा इतर घरगुती कार्यक्रम पनवेल येथील अर्पिता फार्मवर साजरा करीत असतो.यावेळेला देखील ख्रिसमस ,नववर्षाच्या सेलिब्रशनासाठी सलमान पनवेल आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App