ज्याच्या – त्याच्या सोयीचे सावरकर!!, तेही विपर्यास करून!!


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व हे आता राजकीय चलनी नाणे बनून वापरात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सावरकरांना आत्तापर्यंत सतत टाळत आलेले काँग्रेसचे नेते देखील आता हिरिरीने त्यांच्यावर बोलू लागले आहेत. भाजपवर वार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना सावरकरांच्या विचारांचे हत्यार सापडले आहे.Swatantryaveer Savarkar and his Hindutva

किंबहुना आपलाच सावरकरांविषयीचा अभ्यास कसा अद्ययावत आहे आणि त्यांनी जे विचार मांडले या विषयी काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक पुढाकार घेऊन भाषणे करताना दिसत आहेत अर्थात त्यामध्ये सावरकरांवर जहरी टीका करण्याचा आणि सध्याच्या मोदी सरकारवर अतिजहरी टीका करण्याचा हेतू आहे हे उघड गुपित आहे. त्

त्याला राहुल गांधी देखील अपवाद नाहीत. परंतु राहुल गांधींचे सावरकरांवरचे राजकीय वार हे बेछूट, बेपर्वा आणि संदर्भ – पुरावेहीन राहिले आहेत. पण काँग्रेस नेते दिग्विजय सिंग शरद पवार, छगन भुजबळ, दिग्विजय सिंह ते आजचे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी सावरकरांनी लिहिलेले संदर्भ घेऊन सध्याच्या भाजप सरकारला ठोकले आहे. ते मात्र निश्चित विपर्यस्त स्वरूपाचे आहेत. सावरकरांच्या विचारांचा या नेत्यांनी पुरता विपर्यास केला आहे.



किंबहुना शरद पवार यांचे भाजपवरचे वार अधिक चतुराईचे आहेत. सावरकरांची विज्ञाननिष्ठा त्यांना मान्य आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठा आणि त्यांच्या विचारांबद्दल वादच होऊ शकत नाहीत, असे ते म्हणतात. पण सावरकरांच्या हिंदुत्वाला मात्र आपल्या वक्तव्यातून चतुराईने वगळतात. सावरकरांनी जो आक्रमक हिंदू राष्ट्रवाद मांडला त्याकडे मात्र ते तोंड फिरवताना दिसतात.

भाजपवर वार करण्यासाठी सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ आणि गाई विषयक विचारांचा निवडक आणि वेचक वापर आपल्या सोयीने करण्याची हातोटी जी पवारांनी साधली आहे, तशीच हातोटी दिग्विजय सिंग आणि आज शिवानंद तिवारी यांनी देखील साधली आहे. सावरकरांनी कधीही गोहत्येचे समर्थन केले नाही. किंबहुना सावरकरांच्या लेखाचे शीर्षक नीट वाचले तर, “गोपूजन नव्हे गोपालन”, हे आहे. सावरकरांनी कायम अंधश्रद्धांवर प्रहार केला आहे. सावरकरांनी कधीही गाईची हत्या करायची मुभा दिलेली नाही. किंबहुना हिंदूंना डिवचण्यासाठी जर कोणी गोहत्या करत असेल तर त्याला कठोर प्रतिबंधच केला पाहिजे, असे सावरकरांनी स्पष्ट लिहिले आहे नेमका हा उल्लेख वगळून शरद पवार, दिग्विजय सिंग, शिवानंद तिवारी आदी नेते सावरकरांनी गोमांस खाण्याचे समर्थन केल्याचे दडपून ठोकून देताना दिसतात. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांची भलामण करणाऱ्या पवारांसारखे नेतेही यात अपवाद नाहीत. सावरकरांनी जे लिहिले त्याचे आपल्या पद्धतीने श्लेश काढून भाजपवर भिरकवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. किंबहुना सावरकरांचे विचार हे आपल्या राजकीय नेत्यांना पूर्णत्वाने कधीही पचत नाहीत, याचेच हे द्योतक आहे.

सावरकर जन्मशताब्दीच्या वर्षी 1983मध्ये जो सावरकरांविषयी “स्वातंत्रवीर” हा विशेषांक काढला होता, त्यामध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेवर लेख लिहिला आहे. पण हिंदुत्वाचा उल्लेख खुबीने टाळला आहे. तोच प्रकार आता देखील काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ पक्षांच्या नेत्यांचा दिसतो आहे. सावरकरांना स्वतःच्या सोयीपुरते स्वीकारायचे आणि बाकीच्या विचारांचा विपर्यास करून त्यांचे हत्यार बनवून भाजपला ठोकत राहायचे हा काँग्रेसनिष्ठ नेत्यांचा सध्या राजकीय उद्योग बनला आहे.

पण या निमित्ताने काँग्रेस निष्ठ नेत्यांनी सावरकरांवर जो गेल्या 60 वर्षांमध्ये बहिष्कार घातला होता, तो मात्र बाजूला झाला आहे. विपर्यस्त स्वरुपात सध्या सावरकरांना मांडण्याची त्यांच्यात चढाओढ दिसते आहे. सावरकर हे आता राजकीय चलनी नाणे बनल्याचे हे उत्तम उदाहरण आहे…!!

Swatantryaveer Savarkar and his Hindutva

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात