अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आजपर्यंत अयोध्येतील गड जिंकणे शक्य झाले नव्हते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे करून दाखविले आहे. त्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने त्यांना मदत केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत योगी आदित्यनाथ यांना जनतेने नाकारले म्हणणाऱ्यांना यामुळे चांगलाच झटका बसला आहे.Congress and Bahujan Samaj Party also helped BJP to win Ayodhya

१९९० पासून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराची उभारणी सुरू झाली आहे. भव्य राममंदिरासोबतच अयोध्या शहराचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून अयोध्येला जागतिक पर्यटनाच्या केंद्रावर स्थान मिळणार आहे. त्यामुळे भाजपासाठी अयोध्येमधील सत्ता महत्वाची ठरणार आहे.



४० सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपचे केवळ ८ जण निवडून आले होते. पण, भाजपाने १६ सदस्य असलेल्या समाजवादी पक्षाला मात देत अयोध्या जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष निवडून आणला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी नाराजी असल्याचे चित्र माध्यमांकडून निर्माण करण्यात आले होते. मात्र, ७५ पैकी ६७ जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष निवडून आले आहेत.

अयोध्या जिल्हा परिषदेत भाजपाचे आठ, समाजवादी पक्षाचे १६, रालोद १, बसपा आणि इतर ११ असे संख्याबळ होते. समाजवादी पक्षाला बहुमतासाठी केवळ ५ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, भाजपने वाहतूक क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या आलोकसिंह रोहित यांची पत्नी रोली सिंह यांना उमेदवारी दिली होती.

समाजवादी पक्षाने माजी मंत्री आनंद सेन यांची पत्नी इंदू सेन यांना उमेदवारी दिली होती. कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाची मते तर भाजपाकडे गेलीच पण समाजवादी पक्षही आपली मते राखू शकला नाही. त्यामुळे अयोध्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला गेला.

देशभरात भाजपाविरोधात प्रादेशिक पक्षांची एकजुट करण्याचे प्रयत्न दिल्लीत सुरु असताना स्थानिक पातळीवर काँग्रेस, बसपा व इतरांनी भाजपशी पडद्याआड समझोता करुन अयोध्येत प्रथमच भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून दिला आहे.

Congress and Bahujan Samaj Party also helped BJP to win Ayodhya

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात