तरुण नैराश्यात जात आहेत, स्थगित MPSC परीक्षा त्वरित घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या – रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders

MPSC Exams :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील फुरसुंगी येथे एका तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुलाखतीच झाल्या नाहीत, नोकरी नाही, त्यात आर्थिक अडचणी यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे आता राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी एमपीएसपी परीक्षा त्वरित घेऊन प्रलंबित नियुक्त्याही त्वरित देण्याची विनंती सरकारला केली आहे. NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील फुरसुंगी येथे एका तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुलाखतीच झाल्या नाहीत, नोकरी नाही, त्यात आर्थिक अडचणी यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे आता राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी एमपीएसपी परीक्षा त्वरित घेऊन प्रलंबित नियुक्त्याही त्वरित देण्याची विनंती सरकारला केली आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट केले की, कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.

स्वप्निल लोणकर हा सिव्हिल इंजिनिअर होता. नैराश्यातून त्याने केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण