नाशिक : पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते आणि बेहरामपूरचे खासदार अधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवून सोनिया गांधी या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना तर खूश करत आहेत. पण त्या आणि ममता बॅनर्जी या दोघीजणी मिळून अधीर रंजन चौधरींना भाजपचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडून देत आहेत का…?? हा मोलाचा राजकीय सवाल उठू लागला आहे.Are sonia gandhi and mamata banerjee pushing adhir ranjan chaudhary towards BJP??
कारण अधीर रंजन चौधरींनी स्वतःच तसे सिग्नल दिल्याचे मानले जात आहे. मध्यंतरी अधीर रंजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जी अनेक पत्रे लिहिली त्यामध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात गंगा किनाऱ्याची स्वच्छता, तेथील मच्छिमांरांसाठी सोयी तसेच तेथील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजना मागितल्या होत्या
विरोधी पक्षनेत्याने अनेक विषयांवर पंतप्रधानांना किंवा लोकसभेच्या सभापतींना अशी पत्रे लिहिणे त्यांनी त्याची उत्तरे देणे हा सर्वसामान्य राजकीय व्यवहार आहे. पण असे म्हणतात, की अधीर रंजन चौधरींच्या गंगेबाबतच्या पत्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषत्वाने लक्ष दिले आहे. अधीर रंजन यांच्या मागण्या आणि सूचनांवर काही काम करता येईल का, याचा विचार सुरू आहे.
तसे घड़ले तर अधीर रंजन यांना पंतप्रधानांनी अधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट होईल. आणि त्याचे राजकीय अर्थ काय असतील हे ओळखण्याएवढ्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी नक्कीच सूज्ञ आहेत. त्यामुळेच अधीर रंजन यांना लोकसभेतील काँग्रेसच्या नेतेपदावरून दूर करण्याचा घाट घातला जातोय.
अधीर रंजन चौधरींना या नेतेपदावरून दूर करण्यासाठी जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी वर नमूद केलेले कारण महत्त्वाचे आहे. पण माध्यमांमध्ये त्याची चर्चा कोणी फारशी केलेली नाही.
फक्त काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणात तृणमूळ काँग्रेसचा उपयोग करून घेण्यासाठी ममता बॅनर्जींचे सोनियाजींनी ऐकले आहे. आणि त्यातूनच त्या अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतील काँग्रेसच्या नेतेपदावरून दूर करीत आहेत, असे सांगितले जात आहे. यासाठी लोकांना रूचतील अशी कारणेही शोधून काढली आहेत. भाजप आणि पंतप्रधानांविरोधात आक्रमक बाजू मांडणारा नेता संसदेत पाहिजे वगैरे कारणे त्यासाठी दाखविली गेली आहेत.
विशेष म्हणजे अधीर रंजन हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. काँग्रेसने विधानसभा निवडणूकीत ० जागा मिळविल्या तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविली होतीच. तिथेही नवा प्रदेशाध्यक्ष दिला जाईल.
पण प्रत्यक्षात अधीर रंजन चौधरींना लोकसभा नेतेपदावरून घालवून सोनिया आणि ममता ही जोडगोळी त्यांना भाजपच्या दिशेनेच ढकलताना दिसते आहे. कारण एकदा ते काँग्रेसच्या नेतेपदातून मुक्त झाले, की त्यांचा राजकीय मार्ग मोकळा होऊ शकतो आणि ते त्या मार्गाने गेले तर ते राजकीय आश्चर्य राहणार नाही…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App