वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्रातले मोदी सरकार आणि पश्चिम बंगाल तृणमूळ काँग्रेसचे सरकार यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बंगाली आंब्यांची पेटी पाठवल्याची बातमी आली आहे. West bengal CM mamata banerjee sends mangos to PM narendra modi, amit shah and other leaders
अर्थात ममतांनी फक्त मोदींनाच बंगाली आंब्यांच्या पेटया पाठवल्यात असे नाही, तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, इतकेच काय पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील आंब्याच्या पेट्या पाठविल्या आहेत. बंगालमधल्या सुप्रसिद्ध हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातींच्या आंब्याची ही गोड भेट आहे.
पण प्रश्न हा आहे, की या आंब्यांची गोडी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधांमध्ये माधुर्य आणणार की पूर्वीचीच राजकीय कटूता कायम राहणार आहे… बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जो अभूतपूर्व राजकीय हिंसाचार झाला, तो ममता सरकार – ३ च्या सुरूवातीच्या काळात झाला. अजूनही त्याच्या जखमा ताज्या आहेत. हजारो हिंदू आपल्या गावांमधून विस्थापित झाले आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारने गुंडगिरीला आळा घालून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होते आहे.
सुप्रिम कोर्टाने बंगालमधील निवडणूकीनंतरच्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकार आणि बंगाल सरकार या दोघांनाही नोटीसा देऊन विशिष्ट मुदतीत उत्तर मागितले आहे. त्या उत्तरावर बंगाल सरकारचे भवितव्य देखील अवलंबून असल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App