शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’

Shiv Sena MLA Sanjay Gaikawad Controvercial Comment on Atrocity Act in Buldana

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गावात असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू, असं वादग्रस्त विधान केलं आहे. Shiv Sena MLA Sanjay Gaikawad Controvercial Comment on Atrocity Act in Buldana


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गावात असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू, असं वादग्रस्त विधान केलं आहे.

आ. संजय राठोड यांचं वादग्रस्त वक्तव्य

खामगावातील वाघ कुटुंबावर 19 जून रोजी हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून चितोडा येथील गावगुंड पोत्या ऊर्फ रमेश हिवराळे याने गावात दहशत निर्माण केली आहे. बुधवारी चितोडा गावात आ. संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत धीर दिला. त्यांना धीर देत असतानाच गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्‍त्र अस्‍त्र, सर्व ताकद पुरवीन, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं.

Shiv Sena MLA Sanjay Gaikawad Controvercial Comment on Atrocity Act in Buldana

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण