Doctor Couple Suicide : राष्ट्रीय डॉक्टर दिनीच आज पुण्यात एका डॉक्टर दांपत्याने आत्महत्या केली. आझाद नगर येथे राहणाऱ्या डॉक्टर पती आणि पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आधी पत्नीने व नंतर पतीने आत्महत्या केली. अंकिता निखिल शेंडकर (वय 26) आणि निखिल दत्तात्रेय शेंडकर (वय 28) अशी दोघांची नावे आहेत. Pune based Doctor Couple Suicide in Azad Nagar
विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय डॉक्टर दिनीच आज पुण्यात एका डॉक्टर दांपत्याने आत्महत्या केली. आझाद नगर येथे राहणाऱ्या डॉक्टर पती आणि पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आधी पत्नीने व नंतर पतीने आत्महत्या केली. अंकिता निखिल शेंडकर (वय 26) आणि निखिल दत्तात्रेय शेंडकर (वय 28) अशी दोघांची नावे आहेत.
अंकिता आणि निखिल दोघेही आझाद नगरमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक गल्ली क्रमांक 2, आझाद नगर येथे असून निखिल अन्यत्र प्रॅक्टिस करत होता. काल रात्री घरी परत येत असताना फोनवरून दोघांमध्ये भांडण झाले. रात्री आठच्या सुमारास निखिल घरी पोहोचला, तेव्हा अंकिताने आत्महत्या केली होती.
अंकिता बेडरूममध्ये लटकलेली आढळली होती. अंकिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर अंकिताचा मृतदेह तिच्या भावाच्या ताब्यात देण्यात आला. पत्नीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने निखिलनेही गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
निखिलच्या मृत्यूची बातमी समजताच पुन्हा वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु दोघे मानसिक तणावातून जात होते आणि दोघांमध्ये भांडण झाले होते, असे सांगण्यात येत आहे.
सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डॉक्टर दांपत्याच्या निधनाने आझाद नगर परिसर तसेच संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. निखिल आणि अंकिताचे नुकतेच लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Pune based Doctor Couple Suicide in Azad Nagar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App