अंमलबजावणी संचालनालयाचे प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना समन्स, मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ED summoned builder avinash bhosale in money laundering case ordered to appear for inquiry

builder avinash bhosale : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. समन्स मिळाल्यावर अविनाश भोसले ईडीच्या चौकशीला सामोरे जातात की काही कारण देऊन चौकशी टाळतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ED summoned builder avinash bhosale in money laundering case ordered to appear for inquiry


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. समन्स मिळाल्यावर अविनाश भोसले ईडीच्या चौकशीला सामोरे जातात की काही कारण देऊन चौकशी टाळतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अविनाश भोसलेंचे सुपुत्र अमित भोसले यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. 1 जुलै रोजी अविनाश भोसले यांची, तर 2 जुलै रोजी अमित भोसले यांची चौकशी होणार आहे. अविनाश भोसले यांनी पुण्यातील एका भूखंडावर बांधकाम केले आहे. हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचा दावा आहे. त्यामुळे सरकारी जमिनीवर बांधकाम केल्याचा भोसले यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणीही ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाने भोसले यांना दिलासा देण्यास नकार दिला. उलट चौकशीला सामोरे जा, असा आदेशच न्यायालयाने दिला. न्यायालयातून दिलासा मिळण्याचा भोसले यांचा मार्ग संपुष्टात आला आहे. यामुळे भोसले यांना आता ईडीच्या चौकशीला सामारे जाण्यावाचून गत्यंतर नाही.

ED summoned builder avinash bhosale in money laundering case ordered to appear for inquiry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण