कोव्हिशील्ड मान्यतेचा गोंधळ, युरोपियन युनियनवर भडकले 54 आफ्रिकी देश, ईयूकडून भेदभाव होत असल्याचा आरोप

54 African countries erupted on the European Union during the chaos on Covishield

Covishield : युरोपियन युनियनने भारतीय कोव्हिशील्ड लसीला मंजुरी न देण्याबद्दल आफ्रिकन संघाने टीका केली आहे. आफ्रिकन युनियनने म्हटले आहे की, युरोपियन युनियनने कोव्हिशील्ड या भारतात बनलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता न दिल्यास आफ्रिकेत ही लस घेणाऱ्यांचे नुकसान होईल. 54 African countries erupted on the European Union during the chaos on Covishield


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  युरोपियन युनियनने भारतीय कोव्हिशील्ड लसीला मंजुरी न देण्याबद्दल आफ्रिकन संघाने टीका केली आहे. आफ्रिकन युनियनने म्हटले आहे की, युरोपियन युनियनने कोव्हिशील्ड या भारतात बनलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता न दिल्यास आफ्रिकेत ही लस घेणाऱ्यांचे नुकसान होईल.

आफ्रिकन युनियन, आफ्रिका रोग नियंत्रण केंद्राने सोमवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, नवीन ईयू नियम अफ्रिकेत कोव्हिशील्ड घेणाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरत आहेत.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोविशील्ड तयार केली आहे. कोव्हिशील्डला गरीब आणि विकसनशील देशांना कोरोनाची लस देण्यासाठी कोव्हॅक्स पुढाकाराने आफ्रिकन देशांमध्ये पाठविण्यात आले होते. परंतु युरोपियन युनियनच्या नव्या नियमांमुळे भारतीय तसेच आफ्रिकन युनियन सदस्य देशांच्या नागरिकांसाठी एक नवीन संकट निर्माण झाले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपीयन संघाने युरोपियन आणि बिगर-युरोपियन नागरिकांना प्रवास करण्यासाठी डिजिटल ग्रीन पास जाहीर केला आहे. ग्रीन पास मिळालेल्या प्रवाशांना कोणत्याही निर्बंधाशिवाय युरोपियन युनियनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येईल. ज्यांनी युरोपियन युनियनने मंजूर केलेली लस घेतलेली असेल त्यांनाच ग्रीन पास मिळेल. युरोपियन युनियनने डिजिटल लसीकरणाच्या प्रमाणपत्रासाठी मंजूर केलेल्या चार लसींमध्ये कोविशिल्डचा समावेश नाही.

54 देशांच्या आफ्रिकन संघटनेने सोमवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हिशील्डला वगळल्यास आफ्रिकन प्रवाशांमध्ये भेदभाव होईल. एस्ट्राझेनेकाची लस देखील युरोपियन युनियनच्या यादीत आहे. भारतात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाने सीरम संस्थेच्या सहकार्याने कोव्हिशील्ड या नावाने एक लस तयार केली आहे. परंतु युरोपियन युनियनने कोव्हिशील्डला मान्यता दिली नाही. युरोपमध्ये अ‍ॅस्ट्राझेनेकाची ही लस वेगळ्या नावाने बनविली जाते, तिला व्हॅक्सजेवरिया म्हटले जाते.

युरोपियन युनियनने ग्रीन पाससाठी केवळ चार लसी मंजूर केल्या आहेत. यामध्ये वॅक्सजेव्हेरिया (ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका), फायझर-बायोएनटेक एसई, मॉडेर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा समावेश आहे.

54 African countries erupted on the European Union during the chaos on Covishield

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण