केंद्रीय कृषी कायद्यांच्या बाजूने पवार, पण काँग्रेसला वाटतेय अडचण; थोरात म्हणाले – राज्यासाठी आम्ही दुसरा कायदा आणणार!

Revenue Minister Balasaheb Thorat Criticizes Central Govt Over Farm Bills Says We Will Bring another Law For State

Revenue Minister Balasaheb Thorat : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राच्या कायद्यांची बाजू घेत हे कायदे रद्द न करता त्यात सुधारणा करावी, असे सुचवले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसने मात्र याउलट भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अडचणीचे असल्याचे म्हणत आम्ही दुसरा कायदा आणणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. Revenue Minister Balasaheb Thorat Criticizes Central Govt Over Farm Bills Says We Will Bring another Law For State


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राच्या कायद्यांची बाजू घेत हे कायदे रद्द न करता त्यात सुधारणा करावी, असे सुचवले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसने मात्र याउलट भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या अडचणीचे असल्याचे म्हणत आम्ही दुसरा कायदा आणणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात वेगळा कृषी कायदा आणणार

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षांची निवड, भाजपचं दबावतंत्र आणि एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या या विषयावर प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले की, केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यादृष्टीने त्यादृष्टीने राज्यात दुसरा कायदा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे.

आमदारांच्या उपस्थितीवरून ठरणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

विधानसभा अध्यक्षांची निवड ही होईलच, मात्र सरकारमधील सर्वांना काळजी ही कोरोनाची आहे. कोरोना टेस्ट केल्यानंतरच समजू शकेल की किती आमदार या अधिवेशनात उपस्थित राहतात त्यावरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल निर्णय घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एमीपएसीच्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये

पुण्यात फुरसुंगीजवळ स्वप्नील लोणकर या एमएपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली. पत्रकारांनी यावर प्रश्न केला असता थोरात म्हणाले की, एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण विद्यार्थ्यांनी जरा संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे मी आवाहन करतो.

Revenue Minister Balasaheb Thorat Criticizes Central Govt Over Farm Bills Says We Will Bring another Law For State

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात