तेलंगणात इमामांचा पगार भागवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी दिले 17 कोटी रुपये!!


वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणा मधील इमाम आणि मुअज्जिन यांचा पगार भागवण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. इमाम आणि मुअज्जिन यांचे गेले 3 महिन्यातले पगार थकले होते. त्यापैकी 2 महिन्यांचा पगार 10 कोटी रुपये आधीच के. चंद्रशेखर राव यांनी रिलीज केले आहेत. 18 जुलै पर्यंत आणखी 7 कोटी रुपये सरकार देईल. याबद्दल तेलंगणा वफ्क बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद मसिउल्लाह खान यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे आभार मानले आहेत.CM KCR for sanctioning Rs 17 crore for salaries of Imam & Muezzins pending for past 3 months

तेलंगणामध्ये मौलाना, इमाम मुअज्जिन यांना दर महिन्याला तेलंगण सरकार 5000 रुपये मानधन देते. गेल्या 3 महिन्यांपासून हे मानधन दिले गेले नव्हते. आता हे मानधन जुलै महिन्यात देण्यात येईल. यासाठी 17 कोटी रुपये के. चंद्रशेखरराव यांनी मंजूर केले आहेत. इमाम, मुअज्जिन यांना सरकारी पगार देण्यात यावा, अशी मागणी ऑल इंडिया सुफी इमाम कौन्सिलचे प्रवक्ते मौलाना हकीम सैफुद्दीन यांनी के चंद्रशेखर राव यांनी केली होती. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत, असे त्यांनी सांगितले. आता इमाम आणि मुअज्जिन यांचा गेल्या 3 महिन्यातला थकलेला पगार के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. त्याबद्दल मोहम्मद मसिउल्लाह खान यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

सोशल मीडिया टीकास्त्र

या मुद्द्यावरून सोशल मीडियात के. चंद्रशेखर राव यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडले आहे. मौलाना, इमामांना पगार देणारे चंद्रशेखर राव बाकीच्या धर्मीयांच्या पुजाऱ्यांना पगार देतात का?, त्यांची काळजी एवढी वाहतात का?, असे सवाल सोशल मीडियातून अनेक युजरनी केले आहेत. कदाचित या टीकेकडे पाहून काही काळ चंद्रशेखर राव हे हिंदू पुजाऱ्यांना देखील पगार देतील. नंतर मामाला थंड झाला की तो बंद करतील, अशी शक्यता काही युजरनी व्यक्त केली आहे.

CM KCR for sanctioning Rs 17 crore for salaries of Imam & Muezzins pending for past 3 months

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात