विशेष प्रतिनिधी
बीड : Amol Khune मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे माजी सहकारी अमोल खुने यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली, याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी खुने यांनी केली आहे.Amol Khune
बीडमध्ये माध्यमांशी बोलताना अमोल खुने म्हणाले की, मनोज जरांगे यांचे सध्याचे आंदोलन मराठा समाजासाठी नसून रद्द झालेली शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे पुन्हा मिळवण्यासाठी असल्याचा संशय आहे. त्यांनी ९८६ कोटी, १५० कोटी आणि ३० कोटी रुपयांच्या कथित निविदांचा उल्लेख करत आंदोलनामागे आर्थिक हितसंबंध असू शकतात, असा आरोप केला.Amol Khune
खुने यांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांचीही नावे घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. “पांडुरंग तारख यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन कशी खरेदी केली? गंगाधर काळकुटे यांनी मालमत्ता कशी घेतली? काही जणांच्या संपत्तीत एवढी झपाट्याने वाढ कशी झाली?” असा सवाल त्यांनी केला. या सर्वांची ईडीमार्फत चौकशी तसेच विशेष तपास पथकाकडून तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर अमोल खुने यांनी नार्को चाचणीचेही आव्हान दिले. “माझीही नार्को चाचणी करा. मी दोषी आढळलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र आरोप खरे ठरल्यास संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनात नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे आरोप अशा वेळी समोर आले आहेत, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते आणि सरकारसोबत चर्चेनंतर ते उपोषण मागे घेतले आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून अमोल खुने यांच्या आरोपांना सविस्तर उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या आरोपांवर पुढे काय प्रतिक्रिया येते आणि सरकार किंवा तपास यंत्रणा याची दखल घेतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App