Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

Laxman Hake

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Laxman Hake मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.Laxman Hake

माध्यमांशी बोलताना हाके म्हणाले, “जरांगे बाजेवर बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू. ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही.” तसेच आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.Laxman Hake

हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्यांवरही टीका केली. मराठा किंवा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी “हास्यास्पद” असल्याचे म्हटले. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे, मग स्वतंत्र मंत्रालयाची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Laxman Hake



यावेळी हाके यांनी जरांगे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. त्यांच्या आंदोलनामागे सामाजिक नव्हे तर राजकीय हेतू असल्याचा आरोप करत, राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही सरकारला इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असा कोणताही निर्णय घेतल्यास राज्यभर आंदोलन उभारले जाईल, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.

ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. नंतर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सरकार या परिस्थितीवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maratha vs OBC Quota Row Intensifies: Laxman Hake Issues Stern Warning to Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात