बांगड्या धार्मिक प्रतिक नाहीत का? हिजाब वादावर उच्च न्यायालयात अजब तर्क


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : बांगड्या धार्मिक प्रतिक नाहीत का? असा अजब तर्क उच्च न्यायालयात हिजाब वादावर झालेल्या सुनावणीत करण्यात आला. अधिवक्ता कुमार यांनी म्हटले आहे की, केवळ हिजाबचा मुद्दा उपस्थित करून सरकार हा प्रतिकूल भेदभाव का करत आहे? बांगड्या घातल्या जातात, ते धार्मिक प्रतीक नाहीत का, तुम्ही या गरीब मुस्लिम मुलींना का निवडत आहेत?Aren’t bangles religious symbols? Strange argument in the High Court on the hijab controversy

कर्नाटक उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी भारतीय राज्यघटनेचे कन्नडमध्ये अधिकृत भाषांतर खंडपीठासमोर ठेवले. कामत म्हणाले की, राज्यघटनेच्या कन्नड भाषांतरात सरकारी आदेशाप्रमाणेच प्रत्येक तरतुदीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हाच शब्द वापरण्यात आला आहे.



त्यावर खंडपीठाने सांगितले की, आम्ही सरकारी आदेशाचा अर्थ लावत आहोत, त्यासाठी वापरलेले शब्द नाही.या प्रकरणाची सुनावणी मार्चनंतर व्हावी, अन्यथा राजकीय पक्ष निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, असे कामत यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि हा विषय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे, आमच्याशी संबंधित नाही.

Aren’t bangles religious symbols? Strange argument in the High Court on the hijab controversy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात