Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद


जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानांची संख्या आता ३ झाली आहे. श्रीनगरच्या जेवानमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात दोन पोलिस शहीद झाले होते, तर 14 जण जखमी झाले होते. बसमध्ये सुमारे 25 पोलीस होते. काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. Another policeman injured in Srinagar terror attack dies, so far 3 martyrs


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानांची संख्या आता ३ झाली आहे. श्रीनगरच्या जेवानमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात दोन पोलिस शहीद झाले होते, तर 14 जण जखमी झाले होते. बसमध्ये सुमारे 25 पोलीस होते. काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सोमवारी संध्याकाळी पंथा चौक परिसरातील जेवान येथे 25 पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात जम्मू आणि काश्मीर सशस्त्र पोलिसांच्या नवव्या बटालियनचे किमान 14 पोलीस जखमी झाले, त्यांना विविध रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यापैकी दोघांचा सोमवारी मृत्यू झाला.



प्राण गमावलेल्यांमध्ये सशस्त्र पोलिसांच्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, या हल्ल्यात दोन ते तीन दहशतवादी सहभागी होते आणि ते अंधाराचा फायदा घेत पळून गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे.

पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला. त्यांनी दहशतवादी हल्ल्याबाबत तपशील मागवला आहे. हल्ल्याच्या घटनेवर जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ट्विट करून म्हटले की, ‘श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या बसवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. शहीद झालेल्या शूर पोलीस जवानांना माझी श्रद्धांजली. दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शोकग्रस्त कुटुंबांप्रति माझ्या संवेदना.”

Another policeman injured in Srinagar terror attack dies, so far 3 martyrs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात