आता मुंबईत रात्रीच्यावेळी होणार कोरोना लसीकरण ; रेल्वे स्थानक परिसरात असणार ही लसीकरण केंद्रे


याआधी लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.परंतु मुंबईमध्ये आता सोमवारपासून संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. Corona vaccination will now be done at night in Mumbai; The vaccination centers will be located in the vicinity of the railway station


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. दरम्यान लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे.याआधी लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.परंतु मुंबईमध्ये आता सोमवारपासून संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ही रात्रीची लसीकरण केंद्रे रेल्वे स्थानक परिसरात असणार आहे. त्यामुळे कष्टकरी, सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.



ही लसीकरण केंद्र रात्रीची सुरू करण्याच महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे अनेकजण नोकरी, रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडले की रात्रीच्या वेळीच घरी परतात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय, अनेकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी त्यांना वेळेअभावी, आवश्यकेतेनुसार लस घेण्याची वेळ मिळाली नाही. अशांना या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.

Corona vaccination will now be done at night in Mumbai; The vaccination centers will be located in the vicinity of the railway station

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात