भाजप आमदार आशा पटेल यांचं डेंग्यूमुळे निधन ; सिद्धपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार


आशा पटेल यांचं पार्थिव उंझा येथे नेण्यात येणार आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांना याठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. BJP MLA Asha Patel dies of dengue; Funeral will be held at Siddhapur Cemetery


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातमधील भाजप आमदार आशा पटेल यांचं डेंग्यूची लागण झाल्याने रविवारी निधन झालं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.आमदार आशा पटेल यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्या प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.



आशा पटेल यांचं पार्थिव उंझा येथे नेण्यात येणार आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांना याठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.दरम्यान आज सोमवारी सिद्धपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आशा पटेल यांच्या निधनाची माहिती समोर येताच, अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे .

कोण आहेत आशा पटेल

मृत आमदार आशा पटेल या महसाना जिल्ह्यातील उंझा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार होत्या. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आशा पटेल या काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकून आपलं ‘आमदार’पद कायम राखलं होतं.

BJP MLA Asha Patel dies of dengue; Funeral will be held at Siddhapur Cemetery

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात