नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट


विशेष प्रतिनिधी

नामटोला – आसाम-नागालँड सीमेवरील नामटोला भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ख्रिसमस आणि हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या उत्सवाच्या आनंदावर या घटनेचे सावट आहे. एरव्ही डिसेंबर महिन्यात असणारी दुकानावरची वर्दळ आणि गोंगाट ऐकू येण्याऐवजी कुजबूज ऐकू येत आहे.Tense atmosphere at Nagaland – Assam border

गेल्या पंधरवड्यात ओटिंग येथे सुरक्षा दलाच्या गोळीबारात तेरा जणांचा मृत्यू झाला आणि या धक्क्यातून परिसरातील नागरिक अजूनही सावरलेले नाहीत.आसामच्या चराईदेव जिल्ह्यातील नामटोला नावाची लहान हे वस्ती नागालँडचे प्रवेशद्वार आहे.



या परिसरात असलेली नीरव शांतता ही येथून ५० किलोमीटर अंतरावर घडलेल्या एका दुर्देवी घटनांचे पडसाद आहेत. स्थानिक किराणा दुकानदार म्हणतात की, कोरोना संकट आल्यानंतर नामटोलाचा बाजार मंदावला. परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर व्यवसाय आणखीच ठप्प पडला आहे.

४ डिसेंबर रोजी नागालँड राज्यात मोन जिल्ह्यात ओटिंग गावात सुरक्षा दलाच्या कथित गोळीबारात १३ कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात आणखी एका व्यक्तीचा आणि एका जवानाचा मृत्यू झाला.

या घटनेच्या विरोधात स्थानिक नागरिक काळे झेंडे फडकावत आहेत. ख्रिसमसशी निगडित वस्तूंच्या खरेदीत घट झाली असली तरी काही दुकानांवर काळ्या झेंड्याची विक्री जोरात सुरू आहे.

ओटिंग पीडितांच्या स्मरणार्थ आठवडाभर शोक पाळण्यात येत असून नागालँडच्या सर्व खासगी वाहनांवर काळे झेंडे फडकावण्यात येत आहे. नामटोलाचे दुकानदार या झेंड्याच्या विक्रीतून कमाई करत आहेत.

Tense atmosphere at Nagaland – Assam border

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात