काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी


वृत्तसंस्था

कोलकाता /काशी : विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे आज उद्घाटन झाल्यानंतर देशभरातील इतर मोठ्या धार्मिक संस्थानांचा व्यक्ती त्याच धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. त्याची पहिली मागणी भाजपनेच केली आहे.Mamata should develop Kolkata’s Kalighat like Kashi Vishwanath Corridor; BJP’s demand

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट मंदिर परिसर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विकसित करावा, अशी मागणी बंगाल भाजपचे नेते दिलीप घोष यांनी केली आहे. कालीघाट परिसरामध्ये स्वतः ममता बॅनर्जी राहतात.



त्यांनी जर त्या परिसराचा विकास केला, तर येथे पर्यटनाला उत्तम वाव मिळेल. भाविकांची देखील चांगली सोय होईल. कोलकात्यासाठी एक अभिमान स्थळ तयार होईल. ममता बॅनर्जी यांनी या सूचनेचा गंभीर विचार जरूर करावा, असे दिलीप घोष यांनी सांगितले आहे.

पण ममता बॅनर्जी यांना सत्ता सोडून दुसरे काही दिसतच नाही. त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर चढवलेला सत्तेचा चष्मा दूर करावा आणि नीट पहावे. त्यांना खऱ्या अर्थाने काम करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी पश्चिम बंगालमध्ये आहेत.

कालीघाट परिसर हा बंगालच्या संस्कृती इतिहासातला महत्त्वाचा घटक आहे. त्याचा जर पुनर्विकास केला तर ममता बॅनर्जी यांचेच नाव इतिहासात कोरले जाईल, असा टोलाही दिलीप घोष यांनी लगावला आहे.

Mamata should develop Kolkata’s Kalighat like Kashi Vishwanath Corridor; BJP’s demand

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात