दिल्ली : अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव द्यावे , भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली मागणी


अकबर हा आक्रमणकर्ता होता, त्यामुळे त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणंच योग्य ठरेल.अस देखील जिंदाल यांनी पत्रात नमूद केले. Delhi: Akbar Road should be named after late CDS General Bipin Rawat, demands BJP media chief


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतल्या भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी दिल्लीतल्या अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. ह्या रस्त्याचं नाव बदलण्याची मागणी पूर्वीही झाली होती.

नवी दिल्ली नगरपरिषदेला लिहिलेल्या पत्रात भाजपाचे मीडिया विभागाचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी लिहिले की, सीडीएस जनरल बिपिन रावत यांची आठवण आपण कायमस्वरुपी जपायला हवी ही विनंती आहे.आठवण जपण्यासाठी दिल्लीच्या अकबर रोडला जनरल बिपिन रावत यांचं नाव द्या. ही जनरल रावत यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तसेच अकबर हा आक्रमणकर्ता होता, त्यामुळे त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणंच योग्य ठरेल.अस देखील जिंदाल यांनी पत्रात नमूद केले.



दरम्यान नवी दिल्ली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सतिश उपाध्याय यांनी सांगितलं की, त्यांचं देखील या मागणीला समर्थन आहे.परंतु हा संपूर्ण निर्णय पूर्ण नवी दिल्ली नगरपरिषदेचा आहे. तसंच सोशल मीडियावरही ही मागणी जोर धरल्याचं दिसून येत आहे.त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नगरपरिषद या गोष्टीचा विचार करेल असंही ते म्हणाले.

Delhi: Akbar Road should be named after late CDS General Bipin Rawat, demands BJP media chief

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात