ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे अमेरिकेत बूस्टर डोससाठी नागरिकांच्या रांगा


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क – अमेरिकेत बूस्टर डोस देण्याची मागणी वाढली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक रांगा लावत आहेत. अमेरिकेत एका दिवसांत सुमारे १० लाख लोकांनी बूस्टर डोस घेतले आहेत. गेल्या आठवड्यात ७० लाख लोकांनी बूस्टर डोस घेतला होता.Buster Vaccination increased in USA

अमेरिकी नियामक संस्थेने सप्टेंबर महिन्यांत कोविड लस बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीला ओमिक्रॉन हुलकावणी देऊ शकणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.



नवीन व्हेरिएंटबाबत फारशी माहिती नाही, परंतु प्रारंभीच्या तपासात डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे संकेत मिळाले आहेत.दरम्यान पाकिस्तानातही ओमिक्रॉन संसर्गाने शिरकाव केला आहे. कराची शहरात एका खासगी रुग्णालयात ६५ वर्षी महिलांच्या अंगी ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आले आहेत.

परदेशातून आलेल्या रुग्णांत कोणतेही लक्षणे नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चाचण्या करूनही अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले नाहीत. मात्र याच लोकांत ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आल्याचे पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Buster Vaccination increased in USA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!