पुण्यातील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह


वृत्तसंस्था

पुणे : पुणे शहरात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला शुक्रवारी संस्थात्मक क्वारंटाईनमधून सोडण्यात आले. The first patient detected with the Omicron variant of Covid-19 in Pune city was discharged from institutional quarantine Friday following a negative RT-PCR test.

‘ओमिक्रॉन झाल्यानंतर मला १४ दिवस विलगिकरण करण्यात आले. घरी परत आल्याने मला दिलासा मिळाला आहे,’ असे ४७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने सांगितले. फिनलंडच्या सहलीनंतर त्याला ताप आला होता. कोरोना पॉझिटिव्ह चाचणी झाली. त्यानंतर, त्याच्या नमुन्यात ओमिक्रॉन झाल्याचे आढळून आले. प्रोटोकॉलनुसार, त्या व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले. ‘मला लक्षणे नसून मला बरे वाटत आहे,’ असे तो पुढे म्हणाला.पिंपरीमध्ये,चार व्यक्तींची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. ज्यात नायजेरियाहून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय परदेशी महिलेचा समावेश आहे. महिला, तिचा भाऊ आणि दोन मुलांना शनिवारी जिजामाता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या महिलेच्या दोन मुलींना डिस्चार्ज मिळालेला नाही, असे जिजामाता हॉस्पिटलमधील कोविड विभागाचे प्रभारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी सांगितले. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात ओमिक्रॉनचे १७ पैकी १० पिंपरीमध्ये तर एक पुण्यात आढळला होता.सध्या पिंपरीत सहा जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

The first patient detected with the Omicron variant of Covid-19 in Pune city was discharged from institutional quarantine Friday following a negative RT-PCR test.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण