Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.MHADA’s full week examination postponed

मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.यात त्यांनी सांगितलं की म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे .आज ही परीक्षा होणार नाही. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं .

जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जावू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासासाठी माफी मागत विद्यार्थ्यांनी सकाळी केंद्रावर जाण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नये, यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ शेअर करत असल्याचंही आव्हाडांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. दरम्यान म्हाडाची परीक्षा आता जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे.

MHADA’s full week examination postponed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात