यूपीत आता गुन्हेगारांची काही खैर नाही – मोदींकडून योगींचे कौतुक


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशात पूर्वी महिला घराबाहेर पडताना दहा वेळेस विचार करायच्या, आता गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहावेळेस विचार करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बलारामपूर येथे आज शरयू कालवा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.PM Modi prays CM Yogi

त्यावेळी ते बोलत होते. शरयू कालवा प्रकल्पाचे स्वप्न तब्बल ४३ वर्षांनंतर साकार होत आहे. ८०८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे गोंडा, बलरामपूर, बहराईच, श्रावस्तीसह नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.



शरयू कालवा प्रकल्प योजना दहा हजार कोटी खर्चातून साकारली आहे. त्यामुळे पूर्वांचलमधील ९ जिल्ह्यातील २५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल. ही योजना पूर्ण होण्यासाठी ४ दशके लागली. १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची बहराईच जिल्ह्यातून सुरवात झाली होती.

तेव्हा त्याचे बजेट ७९ कोटी रुपये होते. १९८२ मध्ये बलरामपूरसह ९ जिल्ह्यांना या प्रकल्पाशी जोडले आहे. २०१७ पर्यंत त्याचे ५२ टक्केच काम झाले होते. परंतु योगी सरकार आल्यानंतर साडेचार वर्षात उर्वरित ४८ टक्के पूर्ण केले.

PM Modi prays CM Yogi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात