सौदी अरेबियानेही मानले तबलिगी दहशतवादाचे प्रवेशद्वार, तबलिगी जमातवर सौदी अरेबियात बंदी


विशेष प्रतिनिधी

रियाध : भारतामध्ये तबलिगी जमातीच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित केल्यावर पुरोगामी चवताळतात. मात्र, आता सोदी अरेबियाच्या या कट्टर इस्लामी देशानेच तबलिगी जमातवर बंदी घातली आहे. ‘दहशतवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका ठेवत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Saudi Arabia also considers Tablighi as a gateway to terrorism, banning Tablighi community in Saudi Arabia

सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना म्हणून ‘तबलिगी जमात’ ओळखली जाते. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तबलिगी जमातीचा मरकझ दिल्लीमध्ये होता. संपूर्ण जगातून त्यावेळी तबलिगी आले होते. त्यांच्यामुळे कोरोना देशात पसरल्याचे आरोपही झाले होते. त्याचबरोबर तबलिगी जमातीकडून दहशतवादाला उत्तेजन दिले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.



जगातील एक श्रीमंत देश आणि मुस्लिम समाजाचा आधारस्तंभ असलेल्या सोदी अरेबियाने हा निर्णय घेतल्यामुळे तबलिगी जमातीला मोठा धक्का बसला आहे. याचा ‘तबलिगी जमात’वर मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयानं मशिदींना याविषयी लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचे निर्देश दिले. शुक्रवारच्या नमाजानंतर अशा संघटनांमध्ये सामील होण्यापासून सावध राहण्याचा इशारा मशिदींतून देण्यात आला.

देशाचे इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल – अलशेक यांनी सोशल मीडियाच्या सहाय्यानं ‘तबलिगी जमात’वर बंदी घालण्याची घोषणा केली. सुन्नी इस्लामी संघटना ‘दहशतवादाचं प्रवेशद्वार’ आणि ‘समाजासाठी धोका’ असल्याचं त्यांनी म्हटलं.

सौदीच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयानं मशीद आणि मौलवींना दिलेल्या निदेर्शानुसार, शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर चर्चेत या विषयांचा समावेश करावा. त्यामध्ये म्हटले आहे की, तलबिगी जमात लोकांचा ब्रेनवॉश करून लोकांना मुख्यत्वे तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढतात. या संघटनेच्या सर्वात महत्त्वाच्या चुकांचा उल्लेख करण्यात यावा.

ही संघटना जनतेसाठी धोकादायक आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहचवा. सौदी अरेबियात ‘तबलिगी’सह इतर धोकादायक गटांशी संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे हेदेखील जनेताला सांगावंसुमारे १०० वर्षांपूर्वी देवबंदी इस्लामिक विद्वान मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी ‘धार्मिक सुधारणा चळवळ’ तबलिगी जमात ही संघटना सुरू केली होती. ‘

तबलिगी जमात’ विशेषत: इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देण्याचं काम करत होती. पूर्णपणे गैर-राजकीय असलेल्या या संघटनेचा उद्देश हा केवळ ‘इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे समजावून सांगणं’ असाच होता.

अरकान (सिद्धांत), कलमा, नमाज, इल्म-ओ-जिक्र (ज्ञान), इकराम-ए-मुस्लीम (मुस्लिमांचा आदर), इखलास-एन-नीयत (योग्य हेतू) आणि तफरीग-ए-वक्त (मेजवानी आणि तबलीगसाठी वेळ काढणे) अशी ही धार्मिक तत्त्वं होती. आता मात्र, ही संघटना कट्टरतावादी आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखली जाते.

Saudi Arabia also considers Tablighi as a gateway to terrorism, banning Tablighi community in Saudi Arabia

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात