काशी विश्वनाथ कॉरिडाॅरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण महिनाभर जे देशाच्या विकासाचे महामंथन होत आहे, त्यामध्ये फक्त देशातल्याच नव्हे तर परदेशातले देखील महत्त्वाचे पाहुणे यात निमंत्रित करण्यात आले आहेत. विविध देशांच्या राजदूतांचे संमेलन आणि विविध देशांच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्र्यांचे संमेलन काशी विश्वनाथ धाम येथे होणार आहे. याचे राजकीय रहस्य काय आहे? याचा फक्त उत्तर प्रदेश निवडणुकीशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे वरवर विचार करता मिळणार नाहीत. कारण या दोन्ही संमेलनांचा उद्देश निवडणुकीशी संबंधित नाही, तर तो भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेशी संबंधित आहे.Kashi Vishwanath Corridor; Importance of ambassadors and ministerial meetings of different countries; Highlights of the mainstream of Indian culture !!
गेल्या 70 वर्षांमध्ये विविध राजवटींनी आणि राज्यकर्त्यांनी भारताची सांस्कृतिक “शोकेस” ही कायम तथाकथित गंगाजमनी तहजीबच्या मर्यादेतच दाखवली. ताजमहल, कुतुबमिनार, जामा मशिद, फत्तेपूर सिक्री हे परकीय पाहुण्यांच्या आकर्षणाचे बिंदू भारतीय राज्यकर्त्यांनी ठरविले होते. या पलिकडे भारत आहे, भारताची सांस्कृतिक विरासत आहे, असे आधीच्या राज्यकर्त्यांनी परकीय राज्यकर्त्यांना फारसी कधी दाखविलेच नाही.
आता भारताची नेमकी सांस्कृतिक विरासत काय आहे?, धर्माच्या पलिकडे जाऊन ही विरासत कशी विकसित झाली आहे?, हे दाखविण्याचा काळ आला आहे आणि त्या महत्तम प्रतिकांच्या स्वरूपात काशी विश्वनाथ धाम आणि गंगा महानदी यांना संपूर्ण जगापुढे प्रस्तुत करण्यात येत आहे. विविध देशांच्या राजदूतांचे संमेलन आणि पर्यटन आणि संस्कृती मंत्र्यांचे संमेलन यांचे हे खरे वैशिष्ट्य आहे.
काशी विश्वनाथ धामाचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व यानिमित्ताने परकीय पाहुण्यांच्या मनावर बिंबवण्यात येईलच, परंतु त्यापलिकडे देशात पर्यटनाचा आणि विविध पायाभूत सुविधांचा कसा विकास झाला आहे या मागचे मूळ प्रेरणा स्त्रोत काय आहेत, हे विविध देशांचे राजदूत आणि पर्यटन – संस्कृती मंत्र्यांच्या संमेलनांच्या निमित्ताने प्रथमच दाखविण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत कोणतेही परदेशी महत्त्वाचे पाहुणे आले, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आले की त्यांना ताजमहाल, फत्तेपूर सिक्री, कुतुबमिनार ही ठिकाणे दाखविण्यात येत असत. तर काशी विश्वनाथ धाम, रामेश्वर महाबलीपुरम, श्रवणबेळगोळ ही स्थाने भारताच्या सांस्कृतिक परंपरा वहन करणारी स्थाने आहेत हे जणू परकीय पाहुण्यांना भारतीय राज्यकर्त्यांनी अपरिचितच ठेवले होते.
आता त्या “अपरिचिता”वरचे मळभ दूर करून भारतीय संस्कृतीची जी मुख्य धारा गंगा-सिंधू संस्कृती याची “शोकेस” काशी विश्वनाथ धाम उद्घाटनाच्या निमित्ताने उघडली जात आहे. या परकीय पाहुण्यांना याची सविस्तर ओळखही करून दिली जाणार आहे. त्यांच्याकरवी भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेची ठळक ओळख संपूर्ण जगभरात जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App