अयोध्येतला दीपोत्सव रामायण चित्ररथांनी सजणार; आठ लाख लोकप्रतिनिधींना योगींचे सहभागाचे आवाहन


वृत्तसंस्था

अयोध्या : श्रीरामाच्या अयोध्येतील पाचवा दीपोत्सव रामायणाच्या चित्ररथांनी सजणार आहे. त्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून अयोध्येत नऊ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. Ayodhya: Students of Avadh University made rangolis at Ram Ki Paidi ahead of Deepotsava

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवाच्या तयारीचा आढावा घेताना उत्तर प्रदेशातील सर्व लोकप्रतिनिधींना म्हणजे खासदार, आमदांपासून ते ग्रामपंचायत सदस्य पर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना दीपोत्सवात वेगळ्या प्रकारे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशात आठ लाखाहून अधिक लोकप्रतिनिधी आहेत. यापैकी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या जवळचे एक घर दत्तक घेऊन तेथे दीपप्रज्वलन करावे आणि गरजू कुटुंबांना व्यक्तींना दिवाळीची भेट वस्तू द्यावी. दिवाळीचा आनंद गरिबांच्या घरांमध्ये देखील पोहोचावा, असे आवाहन यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून उत्तर प्रदेशात 43 लाख घरी शहरी आणि ग्रामीण भागात देण्यात आली आहेत प्रत्येक घरात दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन योगिनी केले आहे लोकप्रतिनिधींना या दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अवध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी येथे राम की पौङी येथे भव्य रांगोळ्या काढून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला आहे.

Ayodhya : Students of Avadh University made rangolis at Ram Ki Paidi ahead of Deepotsava

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात