परमबीर सिंग आदित्य ठाकरे यांच्या जवळचे, त्यांनाच विचारा कोठे पळून गेले? नितेश राणे यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. ते कोठे पळून गेले आहेत हे आदित्य ठाकरे यांना विचारायला हवे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.Parambir Singh is close to Aditya Thackeray, ask him where did he run away? Criticism of Nitesh Rane

ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत? असा सवाल केला होता. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत केली असेल असा दावा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत असे म्हटले आहे.



या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते ते कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. ते म्हणाले, परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत.

पोलीस आयुक्तांच्या आॅफिसमधील सीसीटीव्ही तपासा, तिथले सीडीआर रिपोर्ट तपासा, तिथल्या पोलिसांकडून माहिती घ्या. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते. ही माझी माहिती नाही तुम्ही पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता.

परमबीर सिंग त्यांच्या जवळ होते मग त्यांनाच विचारले पाहिजे ना का पळाले आणि कुठे गेले आहेत? परमबीर सिंग यांच्याकडे फक्त अनिल देशमुखांचीच माहिती नाही आहे. सुशांत सिंह राजपूतचे काय झाले? दिशा सालियानचे काय झाले? ही सर्व माहिती सुद्धा त्यात परमबीर सिंह यांच्याकडे आहे.

दिशा सालियानच्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाली. या सर्व माहितीचा कटोरा परमबीर सिंग यांच्याकडे पण आहे. म्हणून परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, जुन्या महापौर बंगल्यावर सगळे तासनतास बसून असायचे. तेव्हा परमबीर सिंग चांगले होते का? मग आज का व्हिलन झाले आहेत? तुम्हाला माहिती असेल तर घेऊन या.

Parambir Singh is close to Aditya Thackeray, ask him where did he run away? Criticism of Nitesh Rane

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात