व्यावसायिक सिलिंडर २६५ रुपये महाग! दिवाळीच्या तोंडावरच किंमतीचा भडका; सुदैवाने, घरगुती गॅसची दरवाढ नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २६५ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला नाही. मात्र, दिवाळीपूर्वी एलपीजी गॅस दरात झालेल्या वाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.LPG Price : LPG cylinder becomes costlier by Rs 265

आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर २०००रुपयांच्या पुढे गेला आहे. याआधी हा सिलिंडर १७३३ रुपये होता. मुंबईत १७८३रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलिंडर आता १९५० रुपयांना मिळणार आहे.तसेच, आता कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलिंडर २०१७.५०.रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २११३ रुपये आहे.दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही.

त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ८९९.५०रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.

LPG Price : LPG cylinder becomes costlier by Rs 265

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!