व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 122 रुपयांची कपात ; आजपासून लागू


व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलिंडरचे दर 1 जून 2021 रोजी बदलले. प्रति सिलिंडर मागे 122 रुपयांची घसघशीत कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. Professional LPG Cylinder Cost Is Reduced by 122 Rupees.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 1 जून 2021 रोजी मोठी कपात करण्यात आली आहे. प्रति सिलिंडर मागे 122 रुपये कपात करण्यात केली आहे. आता 19 किलो सिलिंडर आता 1473.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 1595.50 रुपये होती. या निर्णयामुळे व्यवसायिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. ही कपात आजपासून अंमलात आली. परंतु, दुसरीकडे अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.

राज्यांमध्ये किंमत काय आहे?

एलपीजीचे दर राज्यात वेगवेगळे असतात. दिल्लीत त्याची किंमत 1473.50 रुपयांवर गेली आहे. मुंबईत ते 1422.50 रुपये आहे. कोलकातामध्ये 1544.50 रुपये आणि चेन्नईचे 1603 रुपये प्रति 19 किलो सिलिंडर असे दर आहेत.

 

मे महिन्यात किंमती बदलल्या नाहीत

मे महिन्यामध्ये अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. मात्र, एप्रिलमध्ये 10 रुपयांची कपात केली होती. आज दिल्लीत सिलिंडरची किंमत 809 रुपये आहे. यावर्षी जानेवारीत दिल्लीत सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये झाली होती. 15 फेब्रुवारीला ही किंमत 769 रुपये केली. यानंतर 25 फेब्रुवारीला सिलिंडरची किंमत वाढून 794 रुपये झाली. मार्चमध्ये सिलिंडरची किंमत 819 रुपये करण्यात आली.

पेट्रोल-डिझेल मंगळवारी पुन्हा भडकले

दिल्लीत डिझेलमध्ये 23 पैसे प्रतिलिटर वाढ झाली तर पेट्रोलच्या दरातही 27 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मंगळवारी दिल्लीत पेट्रोल 94.49 रुपयांवर पोचले आणि डिझेलही प्रति लिटर 85.38 रुपयांवर पोचले. एक दिवस आधी देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 25 ते 31 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या दरात 25-29 पैशांची वाढ झाली होती.

इंधनाच्या किंमती पहाटे 6 वाजता बदलतात

दररोज पहाटे 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात. त्यांच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर खर्च जोडल्यानंतर ते दुप्पट होतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Professional LPG Cylinder Cost Is Reduced by 122 Rupees.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात