ममतांचे नेमके इरादे काय? त्या काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला पर्यायी नेतृत्व ठरू शकतील?


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चलो दिल्लीची घोषणा करून चार महिने उलटले आहेत. त्यांची वाटचाल देखील त्या दिशेने सुरू झाली आहे. एकेका राज्यात जाऊन त्या भाजप विरोधात तोंडी तोफा डागून प्रत्यक्षात काँग्रेस फोडताना दिसत आहेत. ही खेळी काँग्रेस नेत्यांच्याही लक्षात येत आहे.What exactly are Mamata’s intentions?

पण ममता बॅनर्जी यांचा इरादा खरेच 2024 ची लोकसभा निवडणुक आहे का? की त्या पलिकडचा त्यांचा कोणता इरादा आहे? ममता बॅनर्जी यांची एकूण राजकीय वाटचाल पाहिली तर तीच शक्यता अधिक वाटते. ममतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला हरवायचे आहे, यात कोणतीही शंका नाही. पण ती हरवण्याची पद्धत मात्र वेगळी दिसते आहे. मोदींना ठरविण्याच्या आधीची पायरी म्हणून ममता बॅनर्जी काँग्रेसलाच भारतीय राजकीय पटलावरून हटवू इच्छितात आणि काँग्रेसला हटविणे शक्य झाले नाही तर निदान गांधी कुटुंबियांना काँग्रेसच्या center stage वरून हटवू इच्छितात. याबाबतीत त्यांचे इरादे जी 23 गटाच्या नेत्यांशी जुळतात. या नेत्यांना देखील पंतप्रधान मोदींना हरवायचे आहे. काँग्रेस मजबूत करायची आहे, पण गांधी कुटुंबीयांचे ओझे त्यांना जड झाले आहे. ममता बॅनर्जी आणि जी 23 या गटाच्या नेत्यांमध्ये फरक हा आहे की ममता बॅनर्जी या स्वयंस्फूर्त आणि स्वतःच्या ताकदीच्या नेत्या आहेत आणि जी 23 गटाचे नेते वृद्धत्वाकडे झुकलेले असून त्यांचे स्वतःचे राजकीय कर्तृत्व अतिशय मर्यादित आहे. त्यांचे इरादे देखील ममतांच्या इराद्यांसारखे पक्के दिसत नाहीत.


Rahul Gandhi Poetry On Farmers : राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी कविता, ‘पीएम हमारे दो के, फिर किसान का क्‍या?’


पण ममतांचा इरादा पक्का आहे. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस कमकुवत करून आपली तृणमूल काँग्रेस मजबूत करायची आणि भाजपला आपणच देशव्यापी पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास भाजपविरोधी मतदारांमध्ये निर्माण करायचा, हा ममतांचा इरादा आहे. तो त्यांनी तृणमूल काँग्रेसचे मुखपत्र “बांगला जागो” यामध्ये लेख लिहून स्पष्ट केला आहे. काँग्रेस पक्ष भाजपला पर्याय देऊ शकत नाही. तो पर्याय ठेवून तृणमूळ काँग्रेसलाच निर्माण करावा लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी या लेखात केले आहे. काँग्रेसची सध्याची राजकीय स्थिती कमकुवत आहेच, पण ती अधिक कमकुवत होत जाईल हे भाकीत ममता बॅनर्जी यांनी वर्तविले आहे. यातच ममता बॅनर्जी यांच्या पुढच्या राजकीय खेळीचे इंगित दडले आहे.

अर्थात या खेळीची प्रक्रिया दीर्घकालीन आहे. ती 2024 पर्यंत पूर्ण होणारी नाही. पण ममता बॅनर्जी यांची कदाचित तोपर्यंत थांबण्याची देखील तयारी असेल. ममता बॅनर्जी आक्रस्ताळ्या आहेत, पण उतावळ्या आहेत का?, याविषयी शंका वाटते. ममता बॅनर्जी यांचे आक्रस्ताळी असणे हा त्यांच्या दीर्घकालीन राजकारणासाठी गुण ठरू शकतो. पण उतावळेपणा कदाचित त्यांचा घात करू शकतो. 2024 चे चॅलेंज स्वीकारल्याचे दाखवून ममता बॅनर्जी या 2029 वर खऱ्या अर्थाने नजर ठेवू शकतात. तोपर्यंत भाजपमध्ये देखील नेतृत्व बदल झालेला असेल आणि तेव्हाची त्यांची टक्कर ही भाजपच्या नव्या नेतृत्वाशी असेल. ते चेहरे कदाचित अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांचे असू शकतील.

पण ममता बॅनर्जी यांनी जर कणखर पावले टाकली आणि उतावळेपणा केला नाही तर त्यांच्यासारख्या mass base असणाऱ्या नेत्याला भाजपची पर्यायी ताकद उभी करणे शक्य आहे.

या आधी हे प्रयत्न शरद पवार, मायावती यांच्यासारख्या नेत्यांनी करून झाले आहेत. पण त्यांची मूलभूत राजकीय कुवत कमी पडली आणि त्यामुळे भाजपला पर्यायी ताकद उभी करण्याचे तर सोडाच ते काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबियांना देखील displaced करू शकले नाहीत. ममतांची मूलभूत राजकीय ताकद शरद पवार आणि मायावती यांच्या पेक्षा कितीतरी मोठी आहे. शिवाय त्यांचे political conviction या दोन्ही नेत्यांपेक्षा अधिक मजबूत आहे. अशा स्थितीत भाजपला पर्यायी ताकद निर्माण करताना काँग्रेसला कमकुवत करत राहणे आणि काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबियांना center stage स्टेजवरून हटविणे या दोन्ही बाबी ममता बॅनर्जी यांना पूर्ण करता येणे शक्य आहे.

अर्थात येथे “शक्य आहे” हाच शब्दप्रयोग वापरणे योग्य ठरेल. कारण राजकारणातली ही लढाई दीर्घकालीन आहे आणि त्यात अनेक चढ-उतार अपेक्षित आहेत. अशा स्थितीत ममता बॅनर्जी आता कितीही प्रबळ असल्या तरी त्यांनी political conisistancy टिकविणे यातच त्यांच्या संभाव्य यशाचे रहस्य दडलेले आहे हे विसरून चालणार नाही. ही political conisistancy कन्सिस्टन्सी गमावली तर मात्र ममता बॅनर्जी यांना आपल्या मूळ इराद्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता कमी आहे. अन्यथा त्यांनी दीर्घ दृष्टीने धीम्या आणि दमदार गतीने वाटचाल चालू ठेवली तर मात्र त्यांच्यासारख्या नेत्याला ही शक्य आहे असे वाटते.

What exactly are Mamata’s intentions?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात