तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली, असुद्दीन ओवेसी यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी शिवसेनेवर केली आहे.Tricolor is the identity of India, Shiv Sena has forgotten nationalism, criticism of Asuddin Owaisi

मुंबईत कलम 144 लागू केल्यावरून टीका करताना ओवेसी म्हणाले, एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत येऊ नये म्हणून ओमायक्रॉनच्या नावावर कलम 144 लागू करण्यात आली. जर राहुल गांधी मुंबई येणार असते तर जमावबंदी लागली असती का?राज्यातील थ्री इन वन सरकार आरक्षण काय असते ते विसरली आहे. हे तीनही पक्ष दाबून खातात आणि स्वातंत्रलढ्यात सहभागी न झालेले राष्ट्रवाद सांगतात. मुस्लिमांनी शिक्षण घेऊ नये अशी अनेकांची भावना आहे, मुस्लिम शिक्षण का घेऊ शकत नाही? किती मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत? असे म्हणत ओवसींनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली.

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाकडून धोका असल्यामुळेच ओवेसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आली.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचे ऐकले. रॅली, मोचार्ना बंदी घालणे हा एक जोक आहे.

सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे.

जलील म्हणाले, लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचे दाखवून देणार आहोत.

Tricolor is the identity of India, Shiv Sena has forgotten nationalism, criticism of Asuddin Owaisi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात