AFGHANISTAN : राज्यघटनेनुसार अमरूल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष : स्वतःच केली घोषणा


  • अफगाणिस्तानच्या राज्यघटनेचा दाखला

वृत्तसंस्था

काबूल : तालिबानच्या आक्रमणाला न जुमानता व्हाईस प्रेसिडंट अमरूल्लाह सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहून राष्ट्राध्यक्ष घोषित केलं आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडले आहे. अशात आता अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेह यांनी आपण काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. अशरफ घनी यांच्या अनुपस्थितीत ते देशाचे काळजीवाहू अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. AFGHANISTAN: According to the constitution, Amrullah Saleh is the caretaker President of Afghanistan.



अफगाणिस्तानमधल्या एक एक प्रांतावर कब्जा मिळवत तालिबान्यांनी राजधानी काबूलला घेरलं. त्यानंतर सत्ता हस्तांतरणासाठी चर्चेला सुरूवातही केली. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी गेलं होतं. या दरम्यान सरकारने शरणागती पत्करली. त्यानंतर अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. अशरफ घनी यांनी ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.

काय म्हणाले सालेह?

अफगाणिस्तानच्या राज्य घटनेचं उदाहरण सालेह यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानच्या राज्यघटनेनुसार जर राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेले असती तर जे उपराष्ट्राध्यक्ष असतात ते काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून तातडीने कारभार स्वीकारतात किंवा त्यांना तातडीने तशी जबाबदारी मिळते. हे उदाहरण देत सालेह यांनी स्वतःला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलं.

AFGHANISTAN : According to the constitution, Amrullah Saleh is the caretaker President of Afghanistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात