महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोट्यवधी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशात ५५ कोटी ४७ लाख ३० हजार नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. केरळमधील वायनाड, दीव-दमण, भुवनेश्वर व लडाख या चार शहरांनी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.Maharashtra is on top in vaccination

या चार ठिकाणच्या सर्वच्या सर्व नागरिकांनी किमान एक तरी डोस घेतला आहे.देशातील एकूण लोकसंख्येच्या ३२.४ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला असून ९.१ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.



केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले, की भारताने एका दिवसात ८८ लाख लसीकरणाचा विक्रम मंगळवारी केला असून लसीकरणाचा वेग वाढल्याचे हे निदर्शक आहे.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या सर्वाधिक लसीकरणाबाबत उत्तर प्रदेश पहिल्या व महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेशात आतापावेतो ५ कोटी ९८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र एकूण लोकसंख्या व लसीकरण यांचे गुणोत्तर लक्षात घेतले तर उत्तर प्रदेश लसीकरणात सर्वांत पिछाडीवर असलेल्या राज्यांत गणला जातो. कारण तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ३१ टक्के नागरिकांना किमान एक डोस दिला गेला आहे.

Maharashtra is on top in vaccination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात