तालीबानची सत्ता आल्यावर अफगाणी चलनात विक्रमी घसरण, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नरही गेले पळून


विशेष प्रतिनिधी

काबूल : अफगणिस्थानवर तालीबानने कब्जा मिळवून सत्ता स्थापन केल्यानंतर अफगाणी चलनात प्रचंड घसरण झाली आहे. अफगाणी चलन ४.६ टक्केने ढासळले असून आता डॉलरचा भाव ८६.०६२५ वर आला आहे. देशाच्या मध्यवर्ती बॅँकेचे गव्हर्नरही पळून गेल्याने चलनामध्ये आणखी घसरण होणार आहे. त्यातच आता यापुढे डॉलर्सचा पुरवठा होणार नसल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. Afghan currency plummets after Taliban comes to power, central bank governor flees

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख अजमल अहमदी काबूलमधून पळून गेले आहेत. अजमल अहमदी यांनी अफगाण सुरक्षा दलांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट केले आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी त्यांनी राष्ट्रपती अशरफ गनी आणि त्यांच्या सल्लागारांना दोषी ठरवले आहे. अहमदी यांनी दहशतवादी शहराच्या सीमेवर होते तोपर्यंत आपण काम करत होतो. रविवारी सकाळी मी काम सुरू केले तेव्हा येणाºया बातम्या चिंताजनक होत्या. अफगाण नेतृत्वावर मी नाराज आहे. देशाला संकटात टाकून ते पळून गेले आहेत, असे अहमदी म्हणाले.



अजमल अहमदी म्हणाले, तालिबानने प्रथम ग्रामीण भाग काबीज केला. त्यानंतर प्रांतीय राजधानींना लक्ष्य केले. यादरम्यान, अनेक अफवा पसरल्या होत्या. लष्कराला लढू नका अशा सूचना वरून येत असल्याची देखील अफवा होती. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतु अफगाणिस्तान राष्ट्रीय सुरक्षा दलाने इतक्या लवकर आपल्या पोस्ट का सोडल्या याबद्दल शंका आहे. असे काहीतरी आहे, जे अस्पष्ट राहिले आहे.

तालिबानच्या एकापाठोपाठ एक प्रांतांवर कब्जाचा संदर्भ देत अजमल अहमदी म्हणाले, गझनीला तालिबान्यांनी सकाळी ताब्यात घेतले. मी काम पूर्ण केले आणि तोपर्यंत हेरात, कंधार आणि बगदी देखील त्यांच्या हातात होते. हेलमंडलाही गंभीर हल्ल्याचा सामना करावा लागला. यानंतर शुक्रवारी मला फोन आला की आम्ही यापुढे डॉलरची शिपमेंट मिळवू शकणार नाही. काही लोकांनी मी पळून गेल्याच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली. शनिवारी सेंट्रल बँकेकडून चलनाचा कमी पुरवठा झाला आणि नंतर दहशत आणखी वाढली.

अहमदी म्हणाले की, चलन वेगाने घसरत होते. मी बँका आणि मनी एक्सचेंजर्सना शांतता राखण्याचे आवाहन केले. पण दुसऱ्याच दिवशी तालिबान काबूल ताब्यात घेईल याची मला खात्री नव्हती. शनिवारी रात्रीच कुटुंबाने मला सांगितले की, सरकारमध्ये सहभागी असलेले बहुतेक लोक आधीच पळून गेले आहेत. यामुळे मी स्तब्ध झालो. सुरक्षा मूल्यांकनात म्हटले होते की तालिबान पुढील ३६ तासांमध्ये काबूलमध्ये असतील आणि सरकार ५६ तासांच्या आत पडेल. मी काळजीत होतो आणि बचावासाठी मी सोमवारचे तिकीट काढले होते. मी बँक सोडली तेव्हा मला कर्मचाऱ्यांची काळजी वाटत होती. पण जेव्हा मी विमानतळावर पोहचलो, तेव्हा बरेच लोक तेथे आधीच उपस्थित होते. यानंतर उपराष्ट्रपती सालेह, दानिशसह अनेक मंत्री निघून गेल्याच्या बातम्या आल्या. मी रविवारी संध्याकाळपर्यंत कामा एअरच्या फ्लाइटमध्ये होतो आणि तेव्हाच कळले की राष्ट्रपती आधीच देश सोडून गेले आहेत.

Afghan currency plummets after Taliban comes to power, central bank governor flees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात