डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

कोझीकोडे: केरळमधील डाव्या आघाडीचे सरकारच्या राजकारणामुळेच केरळमध्ये कोरोना वाढत आहे. महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केरळ केंद्र बनतेय असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. Corona is on the rise in Kerala due to left-wing politics, becoming a hotbed of violence and terrorism against women. P. Nadda’s attack

केरळमधील कोझीकोडे येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या आभासी उद्घाटनावेळी नड्डा बोलत होते. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मदत करून सर्वतोपरी पाठिंबा दिला असला तरी, केरळध्ये पाहिजे तसे काम होत नाही. कोविड व्यवस्थापन होत नाही. या गैरव्यवस्थापनामुळेच दररोज २० हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण हे केरळमधीलच आहेत.

केरळचे कोरोना व्यवस्थापनाचे तथाकथित मॉडेल कोठे गेले असा सवाल करून नड्डा म्हणाले, केरळमधील गैरव्यवस्थापन संपूर्ण देशावरील ओझे बनले आहे. उत्तरेकडील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ही राज्ये कोविड व्यवस्थापनात चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, केरळमध्ये हे होताना दिसत नाही. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात सुरूवातीला रॅपिड अँटीजेन टेस्टिंग केले जात होते. त्यानंतरआरटीपीसीआर चाचण्यांचा पर्याय निवडला, असे ते म्हणाले.



केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना नड्डा म्हणाले, बलात्काराच्या घटनांची संख्या, महिला आणि मुलांना लक्ष्य करण्याच्या वाढत्या घटना पाहता येथील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. दहशतवाद्यांची अनेक मॉड्युल्स येथे काम करत आहेत. सोन्याची तस्करी वाढली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचाही सोन्याच्या तस्करीशी संबंध उघड झाला आहे. केरळची ओळख आता दहशतवाद्यांचे केंद्र, सोने तस्करी आणि इसीसीचे भरती केंद्र म्हणून झाली आहे. या सगळ्याचे मूक दर्शक म्हणून पोलीस काम तरत आहेत.

प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहण्याची सवय लागल्याने अनेक राजकारण्यांवर कारवाई केली जात नाही.
नड्डा म्हणाले, यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील नऊ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेचेी राजकारण केले. बलात्कारातील पीडितेची ओळख उघड करून नये असता कायदा असताना त्यांनी पीडित कुटुंबाचे फोटो ट्विट केले. त्यामुळे त्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केले पाहिजे. दोन दिवस त्यांनी केरळमध्ये राजकीय पर्यटन केले.

Corona is on the rise in Kerala due to left-wing politics, becoming a hotbed of violence and terrorism against women. P. Nadda’s attack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात