ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ट्विटरने अकाऊंट सस्पेंड करून राहूल गांधी यांना झटका दिल्यावर आता फेसबुकनेही नोटीस बजावली आहे. अत्याचारानंतर हत्या झालेल्या पीडितेची ओळख जाहीर करणारे तिच्या कुटुंबीयांची छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या  राहुल गांधी यांना फेसबुकने नोटीस जारी करीत ही पोस्ट हटवण्यास सांगितले आहे. Facebook also issues notice to Rahul Gandhi after Twitter’s blow

फेसबुकने म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवर ही छायाचित्रे प्रसारित करण्याबाबत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने (एनसीपीसीआर) तुम्हाला 10 ऑगस्ट रोजी नोटिस बजावली आहे. बालन्याय कायदा 2015 मधील कलम 74, भादंवितील कलम 288 ए अन्वये ही कृती बेकायदेशीर असून, एनसीपीसीआरने बजावलेली नोटिस लक्षात घेता तुम्ही ही पोस्ट त्वरित हटवावी.



या प्रकरणात एनसीपीसीआरसमोर व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती फेसबुकने केली असून, याबाबत आयोग लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. फेसबुकने आम्हाला उत्तर दिले आहे. याबाबत राहुल गांधी यांना नोटिस जारी करून ही पोस्ट त्वरित हटवण्यात यावी, असे उत्तर फेसबुकने दिले आहे, अशी माहिती एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूंगो यांनी दिली.

आयटी, पोक्सो, बालन्याय कायदा, सीआरपीसी, एनसीपीसीआरमधील प्रत्येक कलमाचा अभ्यास केल्यानंतर जास्तीत जास्त दोन दिवसांत या प्रकरणी आम्ही आदेश देऊ, असे त्यांनी सांगितले.

Facebook also issues notice to Rahul Gandhi after Twitter’s blow

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात