महाराष्ट्रात डेल्टा प्लसने वाढविली चिंता, राज्यात आणखी १० नव्या रुग्णांची नोंद


विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नव्या १० रुग्णांची नोंद झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत राज्यात डेल्टा प्लसमुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण ७६ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.Delta plus patients increased in Maharashtra

आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी सर्वाधिक ३९ प्लस रुग्ण हे १९ ते ४५ वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १९ रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील नऊ बालके असून ६० वर्षांवरील नऊ रुग्ण आहेत.नव्याने सापडलेल्या १० रुग्णांपैकी सहा रुग्ण कोल्हापुरातील असून रत्नागिरीतील तीन; तर एक जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. हे दहाही रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन मृत्यू रत्नागिरीतील; तर बीड, मुंबई आणि रायगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत. जिनोम सिक्वेंसिंग तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Delta plus patients increased in Maharashtra

विशेष प्रतिनिधी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था