चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा


माणूस हा नेहमीच स्मरणरंजनात राहणारा प्राणी आहे. गत काळात जे झाले त्याबद्दल आठवायचे किंवा काय होईल या तर्कावर विचार करत राहायची त्याची सवय आहे. खरं तर वर्तमानात राहिल्याने सारे काही साध्य होणार आहे याची माहिती असताना देखील माणूस स्मरणरंजनात आनंद मानतो. Remember the good things.

आणखी महत्त्वाचे, माणूस जे काही चूकीचे आहे, नकारात्मक आहे त्याचेच स्मरण करत रहातो. अगदीच क्वचित जे काही चांगले, धूत आहे त्याचा विचार करतो. कधी जास्त प्रेमाचे क्षण, आपुलकीचे क्षण आठवावेत त्यामध्ये तरळत रहावे असे कमीच घडताना दिसते. अपमानाचे संतापाचे क्षणच माणसाच्या स्मृतीत जास्त राहतात आणि माणूस याच क्षणांत घुटमळून जातो.

याच कारणाने आजच्या दिवसाचा आनंदही घालवून बसतो. ओशो म्हणायचे, विधायक अनुभूतींचं स्मरण फार बहु्मुल्य असतं. त्या त्या स्मृतींचे स्मरण केल्यामुळे दोन गोष्टी होतात पहिली म्हणजे पुन्हा एकदा अगदी तसेच विधायक काम होण्याची शक्यता वाढते. दुसरं असं की स्मरणपुर्वक जे काही वृथा आहे त्याला सोडून द्या. काटे विसरून फक्त फुलांची आठवण राहू दया. आपण का. आठवतो त्याप्रमाणे आपण होत असतो.

त्यामुळे नेहमी चांगल्या स्मृती आठवण्याचा प्रयत्न करा. हे वाचायला जितके सोपे आहे तितकेच अंमलात आणण्यास फार अवघड आहे. त्यामुळे आज दिवसा उठल्यानंतर चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. त्यात खरे हित आहे.

Remember the good things.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात