लखनौ – केवळ तोकडे कपडे घातल्यामुळे कुणी महान बनू शकले असते तर राखी सावंत ही महात्मा गांधी यांच्यापेक्षा महान ठरली असती, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ह्रदयनारायण दिक्षीत यांनी केले.UP assembly speaker did controversial remarks
सत्ताधारी भाजपच्या प्रबुद्ध वर्ग संमेलनात त्यांनी हे वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांच्यावर सोशल मिडीयामधून बरीच टीका होत आहे. दीक्षित म्हणाले की, गांधीजी गरजेपुरते कपडे घालत असत. ते केवळ धोतर गुंडाळत. देश त्यांना बापू या नावाने संबोधायचा. फक्त कपडे कमी घातल्यामुळे कुणी महान बनले असते तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत श्रेष्ठ ठरली असती.
दिक्षीत यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाला. त्यानंतर दीक्षित यांनी हिंदीतून सलग ट्विट केल्या. खुलासे करताना त्यांनी म्हटले आहे की, सोशल मिडीयातील काही मित्र माझ्या भाषणाच्या क्लीपवरून चुकीचा अर्थ काढत आहेत. मी आत्मसाक्षात्कार झालेला लेखक आहे, अशी ओळख संमेलनाच्या सुत्रसंचालकांनी करून दिली.
त्यांचा मुद्दा मी पुढे नेत म्हणालो की, केवळ काही पुस्तके लिहील्यामुळे कुणी बुद्धिमान बनत नाही. महात्मा गांधी गरजेपुरते कपडे घालत असत. पण म्हणून राखी सावंत ही गांधीजी बनणार असे नाही. मित्रांनो माझे भाषण योग्य संदर्भात घ्या, असेही दिक्षीत यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App