लहान, स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार उत्पादक कंपन्यांना आवाहन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लहान, स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कार उत्पादक कंपन्यांना केले आहे.
Nitin Gadkari appeals to Vehicle companies to provide 6 airbags even in small and cheap cars

रस्ते अपघात टाळण्याबरोबरच अपघातांमधील मृतांची संख्या कमी करण्यासाठी वाहनांमधील एअरबॅग मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे नितीन गडकरी यांनी छोट्या कारमध्येही चांगले सेफ्टी फीचर्स देण्याची गरज व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, लहान कार, ज्या बहुतांश निम्न मध्यमवर्गीय लोकांकडून विकत घेतल्या जातात, त्यातही पुरेशा संख्येने एअरबॅग असाव्यात. ऑटोमेकर्स फक्त श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या मोठ्या आणि महागड्या कारमध्येच आठ एअरबॅग का देतात?, याचे मला आश्चर्य वाटत आहे.

ते म्हणाले, लहान आणि स्वस्त कारमध्ये अधिक एअरबॅग देणे आवश्यक आहे. ज्यामुळे अपघातांमध्ये मृत्यू रोखण्यात मदत होईल. बहुतेक मध्यमवर्गीय लोक लहान आणि स्वस्त कार विकत घेतात आणि जर त्यांच्या कारमध्ये एअरबॅग नसतील तर अपघात झाले तर त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे एअरबॅग पुरविल्या पाहिजेत.

Nitin Gadkari appeals to Vehicle companies to provide 6 airbags even in small and cheap cars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण