आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींसह अनेक नेत्यांनी व्यक्त केला शोक

Akhada Parishad President Mahant Narendra Giri Died, PM Modi Expressed Grief

Akhada Parishad President Mahant Narendra Giri Died :  प्रयागराजमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचे निधन झाले आहे. बाघंबरी मठातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. रूम आतून बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यांच्या एका शिष्याने फोनद्वारे माहिती दिली, त्यानंतर पोलिसांचे पथक पोहोचले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. Akhada Parishad President Mahant Narendra Giri Died, PM Modi Expressed Grief


वृत्तसंस्था

लखनऊ : प्रयागराजमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचे निधन झाले आहे. बाघंबरी मठातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. रूम आतून बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यांच्या एका शिष्याने फोनद्वारे माहिती दिली, त्यानंतर पोलिसांचे पथक पोहोचले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

सुसाईड नोट आढळली

नरेंद्र गिरी यांच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये आनंद गिरी यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. नरेंद्र गिरी यांनी लिहिले आहे की, ते आनंदवर नाराज होते. मात्र, सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. संशयास्पद परिस्थिती पाहता प्रशासन शवविच्छेदनाबाबत विचार करत आहे.

नरेंद्र गिरी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असत. काल सकाळीच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांची भेट घेतली. ते सतत तणावाखाली होते व त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशीही जुना वाद होता. पूर्वी त्यांनी आनंद गिरीला मठापासून वेगळे केले होते. मात्र, नंतर त्याचा समेट झाली, असे सांगितले जात आहे.

शिष्य आनंद गिरी म्हणाले, हत्या झाली, तपास व्हावा!

पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, सुसाईड नोटमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिले आहे की, ते सन्मानाने आयुष्य जगत राहिले पण आता त्यांना अपमानित होऊन जगावे लागत होते. सुसाईड नोटमध्ये शिष्यामुळे दु:खी झाल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, एक बातमी आहे की, महंत यांच्याशी झालेल्या वादानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिष्य आनंद गिरी यांनी ही घटना हत्या असल्याचे म्हटले आहे. हे एक मोठे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, नरेंद्र गिरी यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना सुसाईड नोटमध्ये माझे नाव लिहिण्यास भाग पाडण्यात आले. मी माफी मागितली होती आणि गुरुजींनी क्षमाही केली होती. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. मी माझी आणि गुरुजींची हत्या करण्याची भीती व्यक्त केली होती. आनंद गिरी यांनी म्हटले की या कटामागे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भूमाफिया आहेत, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधनावर शोक व्यक्त करत ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले की, आखाडा परिषदोचे अध्यक्ष श्री नरेंद्र गिरीजी यांचे देहावसान अत्यंत दु:खद आहे. आध्यात्मिक परंपरांप्रति समर्पित राहत त्यांनी संत समाजाच्या अनेक धारा एकत्र जोडण्यात मोठी भूमिका निभावली. प्रभु त्यांना आपल्या श्री चरणांमध्ये स्थान द्यावे. ॐ शांति!!”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्वीट

नरेंद्र गिरी यांच्या निधनाची बातमी येताच संत जगतात तसेच राजकीय पक्षांमध्ये शोककळा पसरली. दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरीजी यांचे निधन हे आध्यात्मिक जगासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. प्रभू श्री राम यांना प्रार्थना आहे की, मृत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान मिळो आणि शोकग्रस्त अनुयायांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे ट्वीट

शोक व्यक्त करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लिहिले की, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय संत महंत नरेंद्र गिरी जी महाराज यांच्या जाण्याबद्दल दुःखद माहिती मिळाली. सनातन धर्मासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या पूज्य स्वामीजींनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. देव त्यांच्या आत्म्यास त्यांच्या चरणी शांती देवो.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ट्वीट

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आणि लिहिले की, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष, पूज्य नरेंद्र गिरी जी यांचे निधन, अपूर्व नुकसान! देव सद्गुरू आत्म्याला त्याच्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या अनुयायांना हे दु: ख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.”

Akhada Parishad President Mahant Narendra Giri Died, PM Modi Expressed Grief

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण