गाझिपुरमध्ये आढळलेला तो बॉम्ब पाकिस्तानातून पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी एक असल्याचे उघड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गाझिपुरमध्ये आढळलेला तो बॉम्ब पाकिस्तानातून पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी एक असल्याचे उघड झाले आहे. The bomb found in Ghazipur was identified as one of 24 bombs sent from Pakistan

पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळली होती. या बॅगेत एक बॉम्ब आढळला होता. तो पाकिस्तानातून पाठविलेल्या २४ बोम्बपैकी एक असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी बॅग आढळलेला परिसर रिकामा केला. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने जेसीबी मागवून एक खोल खड्डा खणून बॉम्ब निकामी केला.



जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमध्ये अलीकडेच शस्त्रसाठा आणि उपकरणे जप्त केली. त्याच मालाचा हा बॉम्ब एक भाग असल्याचे मानले जाते. काही उपकरणांची गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये तस्करी झाल्याचा संशय आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाझीपूर डिव्हाईस एक टिफीन बॉम्ब होता. ज्यामध्ये तीन किलोग्रॅम आरडीएक्स न्यूक्लियर चार्ज आणि सेंकडरी चार्ज म्हणून अमोनियम नायट्रेट होता. दिल्ली पोलिसांच्या मते ही आयडीची खेप भारतात प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच पोहचली होती. दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अन्य आयडी जप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत.

The bomb found in Ghazipur was identified as one of 24 bombs sent from Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात