मध्य प्रदेश : सिवनी जिल्ह्यात कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू , 29 बछड्यांना जन्म देण्याचा वाघिणीचा विक्रम


मध्य प्रदेश राज्याला वाघांच राज्य म्हणून ओळख देण्यात कॉलरवाली वाघिणीचा मोठा हातभार आहे.या वाघिणीचा जन्म 2005 मध्ये झाला होता. Madhya Pradesh: Death of collard calf death in Seoni district, record of giving birth to 29 calves


विशेष प्रतिनिधी

सिवनी : मध्य प्रदेशातील सिवनी या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकवील्पातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीने शनिवारी अखेरचा श्वास घेतला आहे.गेल्या काही आठवड्यापासून ही वाघिण आजारी होती. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पेंचची राणी म्हणूनही तिची ओळख होती.ही वाघिण 16-17 वर्षांची होती.मध्य प्रदेश राज्याला वाघांच राज्य म्हणून ओळख देण्यात कॉलरवाली वाघिणीचा मोठा हातभार आहे.या वाघिणीचा जन्म 2005 मध्ये झाला होता. 2019 मध्ये या वाघिणीने 29 बछड्यांना जन्म दिला आहे.

सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम कॉलरवाली वाघिणीच्या नावावर होता.या वाघिणीचा मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या वाघिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

2005 मध्ये या वाघिणीचा जन्म पेंच नॅशनल पार्कमध्ये साली झाला होता .2008 मध्ये तिने पहिल्यांदा बछड्यांना जन्म दिला होता. 2008 ते 2021 पर्यंत वाघिणीने 8 वेळा आई बनून एकूण 29 बछड्यांना जन्म दिला.

Madhya Pradesh: Death of collard calf death in Seoni district, record of giving birth to 29 calves

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात