वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्व खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्याची विनंती प्रसिद्ध उद्योजिका आणि बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. All Private Employees should Get Booster Dose? Kiran Mazumdar made a demand to the PM Narendra modi
देशात रविवारी कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी ७६ कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कंपन्यांचे कर्मचारी देखील कोरोनाबाधित सापडत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामात बाधा निर्माण होत आहे. उद्योगधंदे सुरु ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे, असे किरण मझुमदार म्हणाल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला देखील टॅग केले आहे.
१० जानेवारीपासून भारतात फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्य़ंत ४० लाख लोकांना ही लस मिळाली आहे. किरण मझुमदार-शॉ या बायोफार्मास्युटिकल्स कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्काराने गौरविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more