पुणे : PMPML मधून प्रवास करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक , उद्यापासून अंमलबजावणी सुरू


PMPML मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे.Pune: Vaccination is required now to travel through PMPML, implementation will start from tomorrow


विशेष प्रतिनिधी

पुणे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करण्यासाठी आता कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.

आता PMPML मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे.उद्यापासून (सोमवार, दि.17) हा बदल लागू होणार आहे.



नवीन नियमावलीचे पत्रक पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सर्व पीएमपीएमएल बस स्थानकांना पाठविण्यात आले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाणार आहे.तसेच सरकारी कार्यालये, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

Pune : Vaccination is required now to travel through PMPML , implementation will start from tomorrow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात