विशेष प्रतिनिधी
पुणे : घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ या कारणांमुळे केंद्रातील भाजप सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे महिलांनी आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला.Agitation of woman Congress against gas cylinder price hike
माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या संगीता तिवारी, महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष पूजा आनंद, उज्ज्वला साळवे, अस्मिता शिंदे, शोभा पनीकर, इंदिरा आहिरे, सुजाता चिन्ता, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, वैशाली मराठे, पल्लवी सुरसे, सीमा सावंत यांच्यासह महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या
सव्वालाखे म्हणाल्या की, सत्तेवर आल्यावर १०० दिवसांत महागाई कमी करू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते पण सत्तेवर येऊन सात वर्ष झाल्यानंतरही ते महागाई कमी करू शकले नाहीत. ते सत्तेवर आल्यापासून दररोज महागाई वाढतच चालली आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्वला गॅसची सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध करत आहेत.
पूजा आनंद म्हणाल्या की, मोदी सत्तेवर आल्यापासून सातत्याने महागाईमुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महिलांनी चुल सोडून गॅसचे कनेक्शन घेतले पण सिलेंडरचे दर १००० रुपयांवर गेल्यामुळे त्यांना पुन्हा चुलीकडे वळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश असून देशातील महिला मोदींनी धडा शिकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more